आंध्रात मालमोटार -बसच्या अपघातात ७ जणांचा मृत्यू   

मुसूनरु : आंध्र प्रदेशात बस आणि दोन मालमोटारी यांच्यातील अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. नेल्‍लोर जिल्ह्यातील मुसूनुरू गावात शनिवारी पहाटे दर्घटना घडली होती. 
 
श्रीकलाशेट्टी परिसरात जनावरांची वाहतूक करणार्‍या एका मालमोटारीला पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास लोखंडी सळ्यांची वाहतूक करणार्‍या दुसर्‍या मालमोटारीने मागून धडक दिली. यानंतर ती समोरून येणार्‍या खासगी बसला धडकली. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित तिघांचा नेल्‍लोर सरकारी रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला आहे. राज्यपाल एस.अब्दुल नझिर यांनी शोक व्यक्‍त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या दु:खात सामील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Related Articles