समीर वानखेडे यांच्याविरुद्ध ईडीकडून गुन्हा दाखल   

मुंबई : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी गुन्हा दाखल केला. दरम्यान, वानखेडे यांनी कोणत्याही कारवाईपासून संरक्षण मिळावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
 
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला ऑक्टोबर 2021 रोजी अमली पदार्थ प्रकरणात वानखेडे यांनी अटक केली होती. मात्र, तत्पूर्वी वानखेडे यांनी शाहरुख कुटुंबीयांकडे 25 कोटींची लाच मागितली होती.  या प्रकरणात केंद्रीय गुप्तचर विभागाने वानखेडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्याची दखल घेत ईडीने वानखेडे यांच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल केला आहे. एनसीबीच्या काही माजी अधिकार्‍यांनाही समन्स बजावण्यात आले आहे.
 
2 ऑक्टोबर 2021 रोजी आर्यन याला कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील कथित अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती. तर, एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाने 27 मे 2023 रोजी आर्यनला या प्रकरणात ‘क्लीन चीट’ दिली.वानखेडे यांनी केलेले आरोप चुकीचे असून, आर्यनचा अमली पदार्थाच्या विक्रीत सहभाग नसल्याचा निर्वाळा विशेष चौकशी पथकाने दिला होता.
 

Related Articles