अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक नेवाडातील विजयामुळे ट्रम्प यांचे पारडे जड   

लास वेगास : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी नेवाडात आयोजित बैठकीत सर्वाधिक मते प्राप्‍त करून विजय संपादन केला आहे. मतमोजणीत ते एकमेव प्रमुख उमेदवार पुढे आले आहेत.
 
अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा ? याबाबत रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिनिधी आणि सदस्यांची मते जाणून घेण्यासाठी विविध राज्यांत बैठका होत आहेत. यापूर्वी ओहायो, दक्षिण कॅरोलिना येथे झालेल्या निवडणुकीतही ट्रम्प यांनी बाजी मारली होती. निक्‍की हेली यांचा गड असलेल्या दक्षिण कॅरोलिना येथील बैठकीतही ट्रम्प यांनी विजय संपादन केला होता. त्यानंतर नेवाडातील बैठकीत ते एकमेव उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. या बैठकीला निक्‍की हेली गैरहजर होत्या. मतमोजणीत स्पष्ट झाले की, ट्रम यांना सर्व 26 मते पडली. विविध ठिकाणी होणार्‍या बैठकीनंतर त्यांना 1 हजार 215 जणांचे समर्थन प्राप्‍त झाले, तर ते रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख उमेदवार म्हणून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार आहेत. आतापयर्र्ंतच्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. निक्‍की हेली अजूनही उमेदवारी प्राप्‍त करण्याच्या रिंगणात आहेत. त्यांनी अजूनही आशा सोडलेली नाही. 

Related Articles