E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
देश
देशभरातील ५३ ‘भारतरत्न’
Samruddhi Dhayagude
10 Feb 2024
केंद्रातील मोदी सरकारने शुक्रवारी आणखी तीन जणांची ‘भारतरत्न’ सन्मानासाठी निवड केली. त्यामुळे देशात भारतरत्न सन्मान मिळवणार्यांची संख्या आता 53 वर पोहोचली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात दहा जणांची भारतरत्न सन्मानासाठी निवड केली. त्यामधील पाच जणांना हा सन्मान देण्यात आला आहे. तर पाच जणांना देणे अद्याप बाकी आहे. या पाच जणांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. आजपर्यंत सर्वाधिक ‘भारतरत्न’ 1999 मध्ये देण्यात आले होते. तेव्हा चार जणांना हा सन्मान प्राप्त झाला होता. शेवटचा भारतरत्न सन्मान 2019 मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना प्रदान करण्यात आला. तर भूपेंद्र कुमार हजारिका आणि नानाजी देशमुख यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. 2020 ते 2023 दरम्यान या सन्मानासाठी कोणाचीही निवड करण्यात आली नव्हती.
पहिला मान कोणाला?
भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. जो साहित्य, कला, समाजसेवा, विज्ञान, शिक्षण, क्रीडा, उद्योग या क्षेत्रांत सर्वोच्च प्रतीचे कार्य करणार्या व्यक्तींना दिला जातो. 2 जानेवारी 1954 पासून हा सन्मान देण्याची परंपरा सुरू झाली. त्याची सुरूवात तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी केली. भारताचे पहिले गव्हर्नर चक्रवर्ती राजगोपालाचारी, माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ. चंद्रशेखर वेंका रमण यांना हा सन्मान देण्यात आला.
निवड कशी होते?
पंतप्रधान कोणत्याही व्यक्तीची भारतरत्नसाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करू शकतात. पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंह राव, शेतकरी नेते चौधरी चरण सिंग आणि हरित क्रांतीचे प्रणेते एम. एस. स्वामीनाथन, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची नावे राष्ट्रपतींना सुचवली होती. यासाठी औपचारिक शिफारस आवश्यक नाही. दरवर्षी या पुरस्कारासाठी निवड केलीच पाहिजे, असेही नाही.
पदक
भारतरत्न पदक तांब्यापासून बनवलेले असते. ज्यामध्ये पिंपळाचे पान आणि त्यावर चमकणारा प्लॅटिनम सूर्य आहे. पानाचा काठ देखील प्लॅटिनम आहे. याच्या खाली भारतरत्न असे लिहिलेले असते. मागील बाजूस अशोक स्तंभ आहे त्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेले असते. भारतरत्न प्राप्तकर्त्यांना पदकासह राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले जाते.
‘हे’ आहेत भारतरत्न
1. सी. राजगोपालाचारी (1954)
2. सर्वपल्ली राधाकृष्णन (1954)
3. सी. व्ही. रमन (1954)
4. भगवान दास (1955)
5. एम. विश्वेेश्वरैया (1955)
6. जवाहरलाल नेहरू (1955)
7. गोविंद बल्लभ पंत (1957)
8. धोंडो केशव कर्वे (1958)
9. बिधन चंद्र रॉय (1961)
10. पुरुषोत्तम दास टंडन (1961)
11. राजेंद्र प्रसाद (1962)
12. जाकिर हुसैन (1963)
13. पांडुरंग वामन काणे (1963)
14. लाल बहादुर शास्त्री (1966)
15. इंदिरा गांधी (1971)
16. वी.वी. गिरी (1975)
17. के. कामराज (1976)
18. मदर तेरेसा (1980)
19. विनोबा भावे (1983)
20. खान अब्दुल गफ्फार खान (1987)
21. एम. जी. रामचंद्रन (1988)
22. भीमराव आंबेडकर (1990)
23. नेल्सन मंडेला (1990)
24. राजीव गांधी (1991)
25. सरदार वल्लभभाई पटेल (1991)
26. मोरारजी देसाई (1991)
27. अबुल कलाम आजाद (1992)
28. जेआरडी टाटा (1992)
29. सत्यजीत रे (1992)
30. गुलजारी लाल नंदा (1997)
31. अरूणा आसिफ अली (1997)
32. एपीजे अब्दुल कलाम (1997)
33. एम.एस. सुब्बलक्ष्मी (1998)
34. चिदंबरम सुब्रमण्यम (1998)
35. जयप्रकाश नारायण (1999)
36. अमर्त्य सेन (1999)
37. गोपीनाथ बोर्दोलोई (1999)
38. रविशंकर (1999)
39. लता मंगेशकर (2001)
40. बिस्मिल्लाह खान (2001)
41. भीमसेन जोशी (2009)
42. सी.एन.आर. राव (2014)
43. सचिन तेंडूलकर (2014)
44. मदन मोहन मालवीय (2015)
45. अटल बिहारी वाजपेई (2015)
46. प्रणव मुखर्जी (2019)
47. नानाजी देशमुख (2019)
48. भूपेन हजारीका (2019)
49. कर्पुरी ठाकूर (2024)
50. लाल कृष्ण अडवाणी (2024)
51. चौधरी चरण सिंह (2024)
52. पी. व्ही. नरसिंह राव (2024)
53. एम.एस.स्वामीनाथन (2024)
Related
Articles
स्प्रिंट सायकलिंगमध्ये महाराष्ट्राची सुवर्ण भरारी
07 Feb 2025
अमली पदार्थांचा चोरटा व्यापार; दोघांना अटक
06 Feb 2025
तेथे कर माझे जुळती...
03 Feb 2025
वाहनाच्या धडकेत १२ वर्षीय मुलीचा मृत्यू
02 Feb 2025
विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा
03 Feb 2025
कुदळवाडी-जाधववाडीतील व्यावसायिकांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
06 Feb 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
असर’च्या अहवालातून शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
2
‘करारांचा’ लाभ किती?
3
वेतन वाढेल; जबाबदारीचे काय?
4
कनिष्ठ, मध्यम वर्गाचा अपेक्षाभंग!
5
पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’
6
भारतीय मुलींनी जिंकला विश्वचषक