चरणसिंग यांचे नातू भाजपच्या आघाडीत   

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न जाहीर करण्यात आल्यानंतर काही तासांतच राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) प्रमुख जयंत चौधरी यांनी शुक्रवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात भाजपबरोबरच्या युतीची घोषणा केली. मी युतीबरोबरची ‘ऑफर’ नाकारू शकत नाही, अशी प्रतिक्रिया जयंत चौधरी यांनी दिली. 
 
जयंत हे चौधरी चरणसिंग यांचे नातू आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत ‘आरएलडी’ला उत्तर प्रदेशात बागपत आणि बिजनौर या दोन जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. 

Related Articles