हर हर गंगेच्या गजरात लाखो भाविकांचे स्नान   

मौनी अमावस्येचा साधला मुहूर्त 

 
प्रयागराज : माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील मौनी अमावस्येला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे लाखो भाविकांनी शुक्रवारी गंगेत स्नान केले. तसेच दानधर्म करून पुण्यही कमावले. 
 
मौनीं अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने शुभ फल प्राप्त होते, अशी भाविकांची अतूट श्रद्धा आहे. प्रयागराज येथे त्रिवेणी संगम आहे. त्या संगमात स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ब्राह्म मुहूर्तापासूनच भाविक स्नानासाठी आले होते. केवळ उत्तर भारतीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या भाविकांनी हर की पौडी येथे स्नान करून दानधर्म केला. लाखोंच्या संख्येने भाविक स्नानासाठी आले होते. 
 
त्यामुळे घाट परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. खास बससेवा उपलब्ध करून दिली होती. तसेच घाटावर खास राहुट्या प्रशासनाने उभ्या केल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्थाही केली होती. 
 

Related Articles