कासारगौड : देशाला धार्मिक राष्ट्र बनविण्याचे कारस्थान काही जणांनी रचले आहे. त्यात काही घटनात्मक पदावरील व्यक्तींचा समावेश आहे, असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनारी विजयन यांनी केला आहे. केरळ सायन्स परिषदेत ते बोलत होते. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्याला धार्मिक राष्ट्र बनविण्याचा घाट काही जणांनी घातला आहे, असे सांगताना ते म्हणाले, बौद्धिक विचार मांडण्याऐवजी भाकड कथा त्यांच्याकडून रचल्या जात आहेत. असे प्रकार घटनात्मक पदावरील काही व्यक्ती करत आहेत. त्यामुळे आता अतिशय दक्षतेने पावले टाकावी लागतील. केरळ विज्ञानाच्या आधारे वाटचाल करत आहे; पण काही तत्त्वे अविज्ञानवादी विचार मांडत आहेत.
Fans
Followers