मुलींसह राबडी देवींना हंगामी जामीन   

नवी दिल्ली : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांच्या कन्या मीसा भारती आणि हेमा यादव यांना येथील एका न्यायालयाने शुक्रवारी जमिनीच्या मोबदल्यात रेल्वेत नोकरी प्रकरणात 28 फेब्रुवारीपर्यंत हंगामी जामीन मंजूर केला.
 
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नियमित जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असे सांगितले. त्यावर, विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी राबडी देवी यांसह दोन्ही मुलींना हंगामी जामीन मंजूर केला. त्यामुळे तिघींनाही मोठा दिलासा मिळाला.या प्रकरणात ईडीने नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यावर, न्यायालयाने राबडी देवी आणि त्यांच्या मुलींना समन्स बजावले होते.

Related Articles