भाजपच्या आमदारांसाठी बिहारमध्ये कार्यशाळा सुरू   

पाटणा : बिहारमधील बोधगया येथे  भाजप आमदारांसाठी दोन दिवसांचे  खास प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विश्‍वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कार्यशाळा आयोजित केली आहे. 
 
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्‍त जनता दलाने लालू प्रसाद यादव (राजद) आणि काँग्रेस यांची साथ सोडून भाजप प्रणित लोकशाही आघाडीसमवेत काही दिवसांपूर्वी सत्ता स्थापन केली होती. लवकरच राज्याचे अंदाजपत्रकीय अधिवेशन होत आहे. तसेच विश्‍वासदर्शक ठरावही सरकारच्या वतीने मांडण्यात येणार आहे. 
 
त्या पार्श्‍वभूमीवर  विधानसभा आणि विधान परिषदेतील भाजप आमदारांना प्रशिक्षण देण्यासाठी खास दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दिली. 11 फेब्रुवारीपर्यंत कार्यशाळा सुरू राहणार आहे. 

Related Articles