E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
महाराष्ट्र
अजित पवार गटाला अधिकृत मान्यता मिळूनही सातार्यात उदासीनता
Samruddhi Dhayagude
10 Feb 2024
सातारा, (वार्ताहर) : सातारा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये गेले पाच दशक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाळ जोडलेली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार असे समीकरण होते पण आता ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांचे पुतणे व राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेतला असून घड्याळ चिन्ह सुद्धा त्यांच्या वाटेला आलेला आहे. त्यामुळे खर्या अर्थाने ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मालक झाले असले तरी त्यांच्याच सातारा जिल्हा या बालेकिल्ल्यात या राजकीय घडामोडी बाबत उदासीनता दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर 24 वर्ष पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला व इतर पक्षात गेले त्यांना सुद्धा यश मिळाले असले तरी मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून अजित दादा पवार गटात गेलेले आदरणीय विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण यांच्याबरोबरच अनेक राष्ट्रवादी मधील दुसर्या फळी व तिसर्या फळी अशा दहा फळ्यातील कार्यकर्त्यांनी मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र केला व नवीन गटांमध्ये जाण्यातच धन्यता मानली.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट सोडून शिवसेना व अपक्ष अशा चाळीस आमदारांनी वेगळा घरोबा केला त्यानंतर न्यायालयात दावे प्रति दावे झाले. या संपूर्ण घडामोडीमध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी आहे. त्यामुळे त्यांना शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण सुद्धा मिळाले. या गोष्टीचा मोठा जल्लोष सातारा जिल्ह्यात निलेश मोरे एकनाथ ओंबळे, बाळासाहेब जाधव, महेश गोडसे तसेच अनेक शिवसैनिकांनी आनंद उत्सव साजरा केला. फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण व कंदी पेढे वाटून स्वागत केले. परंतु महायुतीचा एक घटक पक्ष असलेल्या अजित दादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत चिन्ह मिळून सुद्धा फारसा गाजावाजा अथवा अनुदोत्सव साजरा झालेला नाही. किंबहुना घड्याळ हे अधिकृत चिन्ह मिळून सुद्धा अनेकांना आनंद उत्सव साजरा करण्यासाठी वेळ नसल्याचे सिद्ध झालेले आहे.
राजकारणामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी अनेक घटनेची नोंद घ्यावी लागते तसेच त्या घटनेबाबत जनतेच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण करावी लागते. याला आता अजित दादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अपवाद ठरलेले आहे. सेनापती ताकदवान असला तरी बाकीच्या सैनिक जर आळशी व पराक्रमी नसले तर युद्ध अथवा लढाई अथवा निवडणुका जिंकता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित दादा पवार यांनीच आता याबाबत मार्गदर्शन करावे अन्यथा कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. आता तो अस्तित्वात नाही. याची मात्र नक्कीच नोंद होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Related
Articles
सराव सामन्यात शुभमन गिल, हार्षीत राणाची शानदार कामगिरी
02 Dec 2024
भारताचा पाकिस्तानवर विजय
06 Dec 2024
‘वंगबंधु’ रहमान यांचे छायाचित्र चलनी नोटांवरून हटवले
07 Dec 2024
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये सहा ठार
02 Dec 2024
सिरियाकडे प्रवास टाळण्याचा भारतीय नागरिकांना सल्ला
07 Dec 2024
झारखंडमध्ये उद्या शपथविधी; मंत्रिमंडळ विस्तार होणार
04 Dec 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
समाज परिवर्तनाची सकारात्मक चळवळ
2
आणखी दहा दिवस शेवगा खरेदी विसरा!
3
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उद्या पदवी प्रदान सोहळा
4
मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील
5
’संगीत स्वयंवर’नाट्यप्रयोग पुढील आठवड्यात
6
पुण्यातील थंडी गायब