भारत-बांगलादेश संयुक्त विजेता   

ढाका : १९ वर्षाखालील फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये संयुक्त विजेता घोषित करण्यात आले आहे. निर्धारित वेळेत सामना एकएकच्या बरोबरीत संपला. त्यानंतर पेनल्टी शूटआउट देखील बरोबरीत संपले. मात्र यादरम्यान वेगळाच राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सामन्याचा निकाल आपल्या बाजून न लागल्याने बांगलादेशाचे चाहते चांगलेच भडकले आणि त्यानंतर मैदानावर दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. यावेळी फॅन्सनी महिली संघावर दगड आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्याचा प्रकार समोर आला.
 
ही फुटबॉल सामना बरोबरीत सुटल्यानंतर अधिकार्‍यांनी नाणेफेक करत भारतीय संघाला स्पर्धेचे विजेते घोषित केले. यांनंतर बांग्लादेशी चाहत्यांनी मैदानावर दगड आणि बाटल्या फेकायला सुरूवात केली. यामुळे सामन्याचा निकाल बदलावा लागला आणि दोन्ही संघाना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. 
 
 निर्धारित 90 मिनिटांचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघांमधील खेळ 1-1 असा बरोबरीत सुटला. यानंतर पेनल्टी शूटआऊट झाले. तेही बरोबरीत राहिले. आणि गोलरक्षकांसह दोन्ही संघांच्या सर्व 11 खेळाडूंनी पेनल्टी किकमध्ये गोल नोंदवले. स्कोअरलाइन 11-11 पर्यंत पोहोचल्यानंतर, रेफ्री पेनल्टी शूटआउट सुरू ठेवणार होते, परंतु नंतर तसे न करण्यास सांगित आले. यानंतर दोन्ही बाजूंच्या कर्णधारांना बोलावून नाणेफेक केली.नाणेफेक जिंकण्यात भारताला यश आले आणि त्यांनी जल्लोष सुरू केला. बांगलादेशींनी याचा जोरदार विरोध केला आणि खेळाडूंनी देखील मैदान सोडण्यास नकार दिला. यानंतर गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. यानंतर मोठ्या संख्येने मैदानावर दगड आणि पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. 
 
 यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. मॅच कमिश्नर ज्यांनी नाणेफेकीचा निर्णय घेतला होता, त्यांनी एक तासाहून अधिका काळानंतर आपला निर्णय बदलून भारत आणि बांग्लादेश यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आला.आयइएएएफकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा अखिर भारतीय फुटबॉल महासंघाकडून ही चांगली बाब असून आम्ही दोन्ही पक्षांकडून संयुक्त विजेता घोषित करण्याचा निर्णय स्वीकारला असल्याचे सांगण्यात आले आहे. स्पर्धेच्या नियामांवरून मॅच अधिकार्‍यांमध्ये संभ्रम होता त्यामुळे ही स्थिती घडल्याचे म्हटले आहे.
 

Related Articles