तिसर्‍या कसोटीपूर्वी दुखापतीमुळे श्रेयस अय्यर बाहेर   

राजकोट : भारताचा मधल्या फळीतीली फलंदाज श्रेयस अय्यरला इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर आधीच संघातून डच्चू मिळण्याची टांगती तलवार लटकत होती.
 
मात्र आता त्याचे दुखापतीचे वृत्त समोर येत आहे. तो इंग्लंडविरूद्धच्या पुढच्या तीन कसोटी सामन्यांना मुकणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अय्यरला पाठीदुखीचा त्रास होत आहे. तसेच त्याचा मांडीचा स्नायू देखील दुखत आहे. 
 
भारतीय संघाला आधीच दुखापतींचा फटका बसला आहे. केएल राहुल, रविंद्र जडेजा अन् मोहम्मद शमी दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. मालिकेत भारताने 1 - 1 अशी बरोबरी साधली आहे. 
 
केएल राहुल आणि रविंद्र जडेजा तिसर्‍या कसोटीत संघात परतण्याची शक्यता आहे. अय्यरच्या दुखापतीमुळे मधल्या फळीत पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
अय्यर हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतींबाबत चाचण्या करून घेणार आहे. दुसरीकडे भारतीय निवडसमितीला अजून विराट कोहली तिसरा कसोटी सामना खेळणार आहे की नाही याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे संघ निवड देखील लांबणीवर पडत आहे. जर श्रेयस अय्यर दुखापतीमुळे इंग्लंडविरूद्धच्या तीनही कसोटी सामन्यांना मुकणार असेल तर त्याच्या रिप्लेसमेंटचा निर्णय घेणं कठिण जाणार आहे. अय्यरची जागा घेण्यासाठी हनुमा विहारी, मयांक अगरवाल आणि रजत पाटीदार हे रेसमध्ये आहेत. निवडसमितीला इंग्लंडविरूद्धच्या तिसर्‍या कसोटीत सर्वोकृष्ट प्लेईंग 11 निवडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
 

Related Articles