व्हॉट्सऍप कट्टा   

कदाचित परंपरा अशीच जन्म घेते...
एका नवीन पोलीस अधिकार्‍याची नेमणूक मुख्यालयात झाली. तपासणी दरम्यान, त्याने मुख्यालयाच्या मैदानावर दोन शिपायांना एका बेंचचे रक्षण करताना पाहिले (ते कुणालाही त्यावर बसू देत नव्हते).
त्याने दोन पोलिसांना विचारले की, तुम्ही या बेंचचे रक्षण का करीत आहात ?...
शिपाई म्हणाले : सर, आम्हाला काहीच माहीत नाही; परंतु पूर्वीच्या अधिकार्‍यांनी आपल्याला या बेंचचे रक्षण करण्यास सांगितले होते. कदाचित ही परंपरा आहे. कारण दोन शिफ्टनुसार या बेंचचे चोवीस तास रक्षण केले जाते.
सध्याच्या अधिकार्‍यांनी मागील अधिकारी बोलावून त्या विशिष्ट बेंचच्या रक्षणाचे कारण विचारले.
मागील अधिकारी म्हणाला : मला पण काही माहीत नाही; परंतु माझ्या आधीच्या अधिकार्‍यांनी त्या बेंचला पहारेकरी लावला होता, म्हणून मीही ती परंपरा पाळली.
नवीन अधिकारी खूप आश्चर्यचकित झाला. तो शेवटच्या आणि त्यापूर्वी शेवटच्या अधिकर्‍याशी बोलला, सर्वांनीच वरील अधिकार्‍याप्रमाणे उत्तर दिले, आणखी पाठीमागे जात नवीन कमांडरने सेवानिवृत्त अधिकार्‍याशी बोलणे झाले ज्याचे वय 75 वर्षे होते.
नवीन अधिकारी त्यांना फोनवर म्हणाला : तुम्हाला त्रास देतो सर, पण या बेंचबद्दल तुम्ही मला थोडी माहिती देऊ शकता का ? जेणेकरून त्याचे रक्षण करणे का आवश्यक आहे की नाही हे मला समजू शकेल.
सेवानिवृत्त अधिकारी आश्चर्यचकित स्वरात म्हणाला : काय? त्या बेंचचा ऑइल पेंट अजून वाळलेला नाही?
------------------
स्वर्गात सर्व काही आहे; 
परंतु मृत्यू नाही, 
गीतेमध्ये सर्व काही आहे; 
परंतु खोटं नाही,
जगात सर्व काही आहे; 
परंतु समाधान नाही,
आणि आज माणसांमध्ये सर्व काही आहे; 
परंतु धीर नाही. धीर धरला तर आयुष्य स्थिर होईल
----------------------
भारतात उदबत्तीचे 2 प्रकार आहेत.
1) देवासाठी
2) डासांसाठी
पण देव येत नाही आणि डास जात नाहीत !
 

Related Articles