E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
बाबा सिद्दीकी यांचाही काँग्रेसला रामराम
Kesari Admin
09 Feb 2024
काँग्रेसला मुंबईत आणखी एक धक्का
मुंबई, (प्रतिनिधी) : मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्य मंत्री बाबा सिद्दीकी यांनी गुरूवारी काँग्रेसची साथ सोडली आहे. आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे सिद्दीकी यांनी ‘एक्स’वरून काल जाहीर केले. ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर सिद्दीकी यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सिद्दीकी हे मुंबईतील अल्पसंख्याक समाजात प्राबल्य असणारे नेते समजले जातात. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
मी लहान वयातच काँग्रेसशी जोडला गेलो. गेल्या 48 वर्षांपासून मी पक्षात होतो. माझा हा प्रवास मी थांबवतो आहे. आज मी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, असे सिद्दीकी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.सिद्दीकी यांचे पुत्र झिशान हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तेही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे.
येत्या १० तारखेला एका छोट्या सभेत मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. मी आता निर्णय घेतला आहे. मला कुणी थांबवण्याचे प्रयत्न केले ते मी सांगणार नाही. मी काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्यानंतरही काही गोष्टी घडल्या नाहीत. त्यामुळे मी ठरवले की आपण लांब गेलेले बरे, असे सिद्दीकी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रत्येक समाजाला घेऊन जाण्याचे काम आजच्या घडीला अजित पवार करत आहेत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले.सिद्दीकी हे 1999, 2004 आणि 2009 असे तीन वेळा विधानसभेवर निवडून आले होते.
Related
Articles
लेबाननमधील आणखी २४ गावे रिकामी करा
03 Oct 2024
लोकमान्यांना गणिताची भुरळ
07 Oct 2024
हमास, इस्रायलकडून हल्ले-प्रति हल्ले सुरूच
08 Oct 2024
व्हॉट्सऍप कट्टा
04 Oct 2024
अभिजात भाषेचा समस्त मराठी बांधवांना अभिमान
04 Oct 2024
धनगर आरक्षणासाठी मंत्रालयात आंदोलन
09 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अभिजात’ मराठी (अग्रलेख)
2
इराणला किंमत चुकवावी लागेल
3
स्कूल व्हॅनचालकाचा मुलींवर अत्याचार
4
वाचक लिहितात
5
विकृतीला चाप
6
अटीतटीची लढत (अग्रलेख)