प्रदीप शर्मा प्राप्तिकराच्या ‘रडार’वर   

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानी झाडाझडती घेतली. शर्मा यांचे अंधेरी पूर्वेतील चकला येथे निवासस्थान असून, तेथे ही कारवाई करण्यात आली.एका माजी आमदार आणि खासदाराशी संबंधित तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. माजी आमदारावर मोठ्या प्रमाणात करचोरी आणि बेनामी संपत्ती जमा केल्याचा संशय आहे. शर्मा हे काही राजकारणी आणि उद्योजकांसोबत जोडलेले आहेत, त्यांचीही करचुकवेगिरीप्रकरणी चौकशी सुरू आहे. 
 
शर्मांसह प्राप्तिकरच्या अधिकार्‍यांनी माजी आमदार आणि व्यापारी घनश्याम दुबे यांच्या घराचीही झडती घेतली. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये दुबे यांच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवासी दुबे, त्याचा चालक हरी प्रसाद आणि भदोही तहसीलचे माजी उपनिबंधक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Related Articles