आशा सेविका आणि गटप्रवर्तकांची मानधन वाढीसाठी निदर्शने   

सातारा, (वार्ताहर) : मानधनवाढीचा अध्यादेश काढावा, या मागणीसाठी आशासेविका आणि गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. या आंदोलनात शेकडो महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. 
 
संघटनेच्या अध्यक्षा कॉ. आनंदी अवघडे यांच्या मार्गदर्शनाखालील आंदोलनात कल्याणी मराठे, राणी कुंभार, संगीता बाजारे, सीमा भोसले, रेखा क्षीरसागर, रूपाली पवार, चित्रा झिरपे, वैशाली भोसले, स्वाती देसाई, सुवर्णा पाटील, जयश्री काळभोर यांच्यासह शेकडो आशासेविका आणि गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. त्यानुसार आशासेविका आणि गटप्रवर्तक यांच्या शासनदरबारी अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांबाबत विचार करण्यात आलेला नाही, तर गेल्यावर्षी आक्टोबर महिन्यात आणि त्यानंतर 12 जानेवारी असे मिळून दोन संप पुकारण्यात आले. तरीही मागण्यांबाबत नुसतीच आश्वासनेच मिळाली. यापुढे मागण्यांबाबत बैठक न घेता मानधन वाढ करावी.

Related Articles