काँग्रेसकडून कृष्ण पत्रिका   

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या श्वेतपत्रिकेआधीच काँग्रेसने गुरुवारी कृष्ण पत्रिका काढून प्रत्युत्तर दिले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) 10 वर्षांच्या काळातील लेखाजोखा या कृष्णपत्रिकेत मांडण्यात आला आहे. 
 
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत देशाची अर्थव्यवस्था बरबाद झाली आहे. बेरोजगारी वाढली आहे आणि कृषीक्षेत्र उद्ध्वस्त झाले. महिलांवरील गुन्ह्यांना आणि अल्पसंख्याकांवरील  अन्यायाला सरकारने प्रोत्साहन दिले. त्यामुळे  काँग्रेसने ‘अन्यायाची दहा वर्षे’ या मथळ्याखाली कृष्णपत्रिका जारी केली. याची संकल्पना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सध्या सुरू असलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’सारखीच आहे. या कृष्णपत्रिकेमध्ये मोदी सरकारमध्ये लोकांना आलेल्या अडचणी आणि आर्थिक समस्यांचा पाढा वाचण्यात आला आहे. सर्व राज्यांमध्ये भेदभाव होत आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांना दुर्लक्षित केले जात आहे. मोदी सरकार लोकांना खरी माहिती देत नाही. बेरोजगारीचा विषय भाजप टाळत आहे. आतापर्यंत किती लोकांना रोजगार मिळाला? असा सवाल करतानाच खर्गे यांनी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महागाई कमी करण्यासाठी तुम्ही काय केले ते सांगा. काँग्रेसला शिव्या द्या, पण महागाई नियंत्रणात आणा, असे सांगितले.
 

Related Articles