‘माझ्याविरोधात सर्व तपास यंत्रणा उभ्या‘   

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने सर्व तपास यंत्रणा माझ्याविरोधात उभ्या केल्या आहेत. त्यांना मला खोट्या प्रकरणात अडकवून माझी भ्रष्टाचारी प्रतिमा तयार करायची आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी  सांगितले. 
 
द्वारका येथे एका शाळेच्या इमारतीच्या पायाभरणीनंतर केजरीवाल म्हणाले, केंद्र दिल्लीतील सर्व काही रोखण्याचा प्रयत्न करते. आम्हाला दिल्लीत रेशन घरपोच पोहोचवायची होती; पण केंद्राने ती बंद केली. पण देवाच्या कृपेने पंजाबमध्ये आम्ही सरकार स्थापन केले. शनिवारी मी पंजाबमध्ये असेन जिथे आम्ही घरोघरी रेशन पोहोचवण्याची योजना सुरू करू. केंद्राने आपल्या सर्व तपास यंत्रणा माझ्याविरोधात तैनात केल्या आहेत. जणू मी मोठा दहशतवादी आहे. तुम्ही वर्तमानपत्रात वाचत असाल की, केजरीवाल यांना ईडीकडून नोटीस, सीबीआयची नोटीस, दिल्ली पोलिसांची नोटीस आली आहे. भ्रष्ट नेता म्हणून माझी प्रतिमा तयार करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुलांना मोफत शिक्षण देणारी, सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत वीज आणि नागरिकांना मोफत उपचार देणारी व्यक्ती भ्रष्ट असू शकते का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

Related Articles