मोदी ओबीसी नेते नाहीत : राहुल   

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी प्रवर्गातील जातीत जन्मला आले नाहीत, तर ते खुल्या प्रवर्गात जन्मले आहेत. परंतु भाजपचे लोक मोदी ओबीसीत जन्मले असे सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला. 
 
पंतप्रधान मोदी यांनी अंदाजपत्रकीय अधिवेशनात भाषण करताना स्वतःला सर्वांत मोठा ओबीसी असल्याचे म्हटले होते. या विधानावर राहुल गांधींनी आक्षेप घेतला. ओडिशातील भारत जोडो न्याय यात्रेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी प्रवर्गातील जातीत जन्मलेले नाहीत. त्यांचा जन्म गुजरातच्या ‘तेली’ जातीत झाला आहे. या जातीला ओबीसी भाजपाने 2000 मध्ये ओबीसी प्रवर्गात टाकले. त्याआधी तेली जात खुल्या प्रवर्गात होती. मात्र, भाजपचे लोक मोदी ओबीसीत जन्मले हे जगाला खोटे सांगत आहेत. ते ओबीसी नाहीत हे मला माहिती आहे.  
 
मोदी कोट्यवधीचा सूट घालतात आणि स्वत:ला गरीब, फकीर सांगतात. मोदी कोणत्याही शेतकरी, कामगाराचा हात पकडत नाहीत. केवळ अदानींचा हात पकडतात. त्यामुळे ते पूर्ण आयुष्यात जातीनिहाय जनगणना करणार नाहीत. जातीनिहाय जनगणना केवळ काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींच करून दाखवतील, असेही राहुल गांधी म्हणाले. 
 
दरम्यान, या वक्तव्यावर आता भाजपने पलटवार केला आहे. भाजपचे अमित मालविय यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत म्हटले की, राहुल गांधींचा दावा साफ खोटा आहे. पंतप्रधान मोदींची जात गुजरातचे मुख्यमंत्री बनण्याच्या दोन वर्षे आधी म्हणजेच 27 ऑक्टोबर 1999 रोजी ओबीसी म्हणून अधिसूचित करण्यात आली होती.
 

Related Articles