चेन्नई-बंगळुरू ग्रीनफील्ड महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार   

नवी दिल्ली : चेन्नई-बंगळुरू ग्रीनफील्ड महामार्ग या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले. 
 
लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना गडकरी म्हणाले, चेन्नई आणि बंगळुरू महामार्ग डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या महामार्गामुळे चेन्नई आणि बंगळुरू दरम्यानचे अंतर दोन तासांत कापले जाऊ शकते. महामार्गासाठी येणा़र्‍या अडचणींसंदर्भात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याशीही मी बोललो आहे आणि त्यांना राज्यातील महामार्ग बांधताना एनएचएआयला येणार्‍या समस्यांची माहिती दिली आहे. 
 
द्रमुकने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले, मला या मुद्द्याचे राजकारण करायचे नाही. पण संपूर्णता साधल्याशिवाय, रस्तेबांधणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळाल्याशिवाय आम्हाला रस्ता पूर्ण करणे कसे शक्य आहे. आम्हाला राज्य सरकारांच्या सहकार्याची गरज आहे, विशेषत: खाणकामासाठी एकत्रित आणि इतर परवानग्या देण्यासंबंधी राज्य सरकारांच्या जबाबदार्‍या खूप महत्त्वाच्या आहेत.  
 
दरम्यान, सदस्य दयानिधी मारन यांनी प्रकल्पाला गती देण्यासाठी येणार्‍या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि अधिकार्‍यांशी चर्चा करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. 
 

Related Articles