झारखंडमध्ये एनआरसी लागू करा : दुबे   

नवी दिल्ली : झारखंडमधील जामतारा, गोड्डा आणि देवघर परिसर बांगलादेशी घुसखोरांचे आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे केंद्र बनले आहे. केंद्र सरकारने या भागात एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स) ची स्थापना करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केली. 
 
शून्य प्रहराच्या तासादरम्यान दुबे म्हणाले, झारखंडमध्ये पूर्वी आदिवासींची लोकसंख्या 36 टक्के होती, ती आता 26 टक्के झाली आहे. आम्ही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या उत्थानाबद्दल बोलतो. पण, प्रत्येक राजकीय पक्ष मतदान मिळवण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना पाठिंबा देत आहे. बांगलादेशी मुस्लिम आदिवासींशी लग्न करत आहेत, त्यामुळे आदिवासींची लोकसंख्या कमी होत आहे, हे थांबले पाहिजे. तसेच, बांगलादेशी घुसखोर आमच्या जमिनीवर कब्जा करत आहेत, हे थांबवा.
 
जामतारा, देवघर आणि गोड्डा हे सायबर गुन्ह्यांचे केंद्र बनत आहेत, हे लक्षात घेऊन सरकारने येथे एनआयए केंद्र स्थापन केले पाहिजे आणि देशात प्रथम या भागांमध्ये एनआरसी लागू केले जावे, जेणेकरून आम्ही बांगलादेशी घुसखोरांपासून स्वतःचे संरक्षण करू शकू, असेही दुबे म्हणाले. 

Related Articles