E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
अतिक्रमण विभागाने जप्त केलेले साहित्य होणार सीलबंद
Kesari Admin
09 Feb 2024
पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईत जप्त केलेले साहित्य आता ’क्यूआर कोड’ने सीलबंद केले जाणार आहे. जप्त केलेल्या साहित्याचा लवकरच लिलावही केला जाणार आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पदपथावर अतिक्रमण करणारे खाद्यपदार्थ विक्रेते, इतर साहित्य विक्रेते, विनापरवाना हातगाडी, स्टॉल आदींवर कारवाई केली जाते. ही कारवाई करताना अतिक्रमण विभागाच्या वतीने संबंधित पथारी व्यावसायिक, स्टॉल धारक यांच्याकडील साहित्य जप्तही केले जाते. त्याचप्रमाणे दंडात्मक कारवाई देखील केली जाते. जप्त केलेले साहित्य अतिक्रमण विभागाच्या गोदामांमध्ये ठेवण्यात येते. संबंधित विक्रेत्याकडून दंड वसूल झाल्यानंतर त्याला ते पुन्हा परत केले जाते. या पद्धतीत आता क्यूआर कोड या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. जप्त केलेल्या साहित्यामध्ये हातगाडी, स्टॉल, सिलेंडर, भांडी तसेच इतर वस्तू, आदींचा समावेश असतो. हे जप्त केलेले साहित्य अतिक्रमण विभागाच्या गोदामांमध्ये ठेवले जाते. साहित्य परत घेण्यासाठी आलेला विक्रेता त्याच्याकडून जप्त केलेले साहित्य हे चोरी झाले किंवा ते पूर्ण नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी करतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून जप्तीची कारवाई करताना व्हिडिओ शूटिंग देखील केले जाते. आता क्यूआर कोडचा वापर करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न अतिक्रमण विभागाकडून केला जात आहे. या प्रक्रियेत जप्त केलेले साहित्य हे क्यूआर कोडने नोंदविले जाईल, तसेच जे छोटे साहित्य आहे हे एका पोत्यामध्ये किंवा बॉक्समध्ये ठेवून त्यावर क्यूआर कोडची नोंद केली जाईल आणि बॉक्स किंवा पोते हे सीलबंद केले जाईल. संबंधित विक्रेत्याला हा क्यूआर कोड देण्यात येईल. त्याने दंड भरल्यानंतर या क्यूआर कोडच्या आधारे त्याला त्याचे जप्त केलेले साहित्य पुन्हा परत दिले जाईल.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केलेल्या साहित्यांचा लवकरच लिलाव केला जाणार आहे. या संदर्भातील प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचे उपायुक्त जगताप यांनी नमूद केले. अतिक्रमण विभागाकडे तेरा गोदामे असून ही सर्व गोदामे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे या साहित्याचा आता लवकरच लिलाव केला जाणार आहे.
Related
Articles
प्रेयसीला नेल्याच्या रागातून प्रियकराच्या वडिलांचे अपहरण
07 Feb 2025
मॅथ्यू ब्रीट्झकेने पदार्पणातच झळकावले शतक
10 Feb 2025
मेक्सिकोत भीषण अपघात; ४१ जणांचा होरपळून मृत्यू
10 Feb 2025
महाकुंभमध्ये पुन्हा तंबूंना आग
09 Feb 2025
महाराष्ट्राची सुदेष्णा वेगवान धावपटू, संजीवनीला सुवर्ण
09 Feb 2025
रायगडमध्ये पोलिसांनीच लुटले व्यापार्याचे दीड कोटी
10 Feb 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
असर’च्या अहवालातून शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
2
संस्कृत वक्तृत्व स्पर्धेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची अमृता करंबळेकर प्रथम
3
आतिशी यांनी गड राखला
4
आरोपांच्या फैरी (अग्रलेख)
5
ब्रिटिशांकडून भारताची लूट
6
वाचक लिहितात