E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
आमदार रवींद्र धंगेकर यांना जामीन मंजूर
Kesari Admin
09 Feb 2024
पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यास शिवीगाळ केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश के.एन. शिंदे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. गोखलेनगर येथील वैदुवाडी येथे 12 लाख लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील 60 लाख लिटर्स क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचा उद्घाटन कार्यक्रम पुणे महापालिकेतर्फे 26 जानेवारीला आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाची जबाबदारी तक्रारदार व महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्यावर सोपविण्यात आली होती.
रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण लोकार्पण करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धंगेकर आणि त्यांचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यासाठी जमले. कार्यकर्ते मोठ्याने घोषणाबाजी करीत होते. दरम्यान धंगेकर यांनी पालिकेच्या मुख्य अभियंत्यास शिवीगाळ केली. याप्रकरणी 29 जानेवारी रोजी फिर्याद देण्यात आली. त्यानुसार धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
धंगेकर यांनी वकिल नितीन भालेराव यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. आरोपी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने धंगेकर यांना अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. वकिल भालेराव यांना वकिल आकाश चिकटे, वकिल अक्षय बडवे, वकिल मयूर चौधरी आणि स्वप्निल दाभाडे यांनी मदत केली.
Related
Articles
आठ वर्षीय चिमुकलीचा हृदयविकाराने मृत्यू
08 Jan 2025
सूर्याचीवाडी तलावामध्ये फ्लेमिंगोंचे आगमन
08 Jan 2025
मद्याचे दर वाढणार
11 Jan 2025
वेण्णा परिसरात पर्यटकाला मारहाण
09 Jan 2025
बारामतीत भरणार जागतिक दर्जाचे कृषी प्रदर्शन
11 Jan 2025
छत्तीसगढमध्ये चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा
06 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)