E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यात राज्यातील नीचांकी तपमानाची नोंद
Kesari Admin
09 Feb 2024
पुणे : हवामानात सातत्याने बदल होत आहेत. उत्तर भारतातून दाखल होत असलेल्या थंड वार्याचा परिणाम पुणे आणि परिसरातही जाणवत आहे. गुरूवारी पुण्यात राज्यातील 14 अंश किमान नीचांकी तपमानाची नोंद झाली. दिवसभर हवामान कोरडे होते.
येत्या बुधवारपर्यंत पुणे शहर आणि परिसरात हवामान कोरडे असणार आहे. रविवारपर्यंत मात्र पहाटे शहरात हलके धुके पडणार आहेत. उद्या (शनिवार) पासून पुन्हा शहरातील किमान तपमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. शहरात पहाटे हवेत काही प्रमाणात गारवा कायम आहे. सकाळी दहानंतर मात्र ऊन पडत आहे. दुपारी चारपर्यंत ऊन कायम राहात आहे. सायंकाळी आकाश अंशत: ढगाळ होत आहे. त्यामुळे उकाडा जाणवत आहे. विशेषत: रात्री वाढलेल्या उकाड्यामुळे फॅन आणि एसीचा वापर करावा लागत आहे.
शहरात काल शिवाजीनगर येथे 34 अंश कमाल व 14 अंश किमान, पाषाण येथे 32 अंश कमाल, तर 15.1 अंश किमान, लोहगाव 34 अंश कमाल, तर 17.5 अंश किमान, लवळे 35 अंश कमाल, तर 20.2 अंश किमान, मगरपट्टा 33 अंश कमाल, तर 21.4 अंश किमान, एनडीए 32 अंश कमाल, तर 12.6 अंश किमान आणि कोरेगाव पार्क 34 अंश कमाल, तर 19 अंश किमान तपमानाची नोंद झाली. शहरातील तपमानात उद्यापासून आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यातील किमान तपमानात वाढ
राज्यातील बहुतांश भागात मागील काही दिवसांपासून कोरडे हवामान आहे. कोरड्या हवामानामुळे तपमानातही वाढ झाली आहे. मागील 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाड्यात बर्याच ठिकाणी किंचित वाढ झाली. उर्वरित राज्यात तपमान सरासरीच्या जवळपास होते. मराठवाड्यात दोन तर विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहेत.
Related
Articles
रिलायन्स इन्फ्रास्ट्रचर संरक्षण सामुग्रीच्या उत्पादनात
30 Oct 2024
महाराष्ट्र, झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार : शहा
28 Oct 2024
मलेशियातील रॅलीत संजय टकले अव्वल
28 Oct 2024
हिमंत बिस्वा यांनी घेतली माजी मंत्री झा यांची भेट
01 Nov 2024
शिवसेना उद्धव गट आणि काँग्रेस पक्षाच्या इच्छूकांची वडगावशेरी मतदारसंघातून माघार
29 Oct 2024
दिवाळीची खरेदीयात्रा
27 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पुण्यातील पाच मतदारसंघांचे चित्र स्पष्ट
2
समाजाच्या उत्थानासाठी ग्रंथालयांची गरज
3
मन उजळणारी दिवाळी
4
आला सण, काढा ‘ऋण’
5
दिवाळी अंक आणि साहित्य रसिक
6
मनसेची परीक्षा (अग्रलेख)