ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत   

बेनोनी : १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान एकमेकांना भिडले.  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणार्‍या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा डाव 179 धावात गुंडाळला. त्याचबरोबर 1 बळी राखुन सामना जिंकला. आणि अंतिम फेरीत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून टॉम स्ट्रेकरने पाकिस्तानचे सहा फलंदाज गारद केले. तर पाकिस्तानकडून अराफत मिनहास आणि अझान अवैस यांनी प्रत्येकी 52 धावा केल्या. 
 
या व्यतिरिक्त शामयल हुसैन (17 धावा) या एकमेव फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला. ऑस्ट्रेलियाने सुरूवातीला भेदक मारा करत निम्मा संघ 79 धावात गारद केला. अराफत आणि अझान यांनी डाव सावरला. या दोघांनी सहाव्या बळी साठी 54 धावांची भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. अजान अवैसने अर्धशतकी मजल मारली. मात्र टॉम स्ट्रेकरने ही जोडी फोडत अजानला 52 धावांवर बाद केलं. त्यानंतर अराफतने 61 चेंडूत 52 धावा करत पाकिस्तानला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र हा सेट झालेला फलंदाज टॉम कॅम्पबेलने बाद करत पाकिस्तानची उरली सुरली आशा देखील धुळीस मिळवली. अराफत बाद झाला त्यावेळी पाकिस्तानच्या 164 धावा झाल्या होत्या. मात्र त्यानंतर पाकिस्तानचा संघ 179 धावात गारद झाला.

Related Articles