E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
कणखर, पण कनवाळू नेता : एकनाथ शिंदे
Kesari Admin
09 Feb 2024
महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जातात. एक आक्रमक तितकेच ते कनवाळू आहेत. विं. दा. करंदीकर यांच्या कवितेतील देणार्याचे हात शिंदे यांचे आहेत. या कणखर नेतृत्वाच्या जवळ गेल्यानंतर ते किती हळवे आहेत, याची प्रचिती येते. आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहर्याकडे पाहून ते कठोर असतील, असे वाटते; परंतु तसे ते नाहीत. लहान-सहान प्रसंगातून त्यांचे आभाळाएवढे मोठेपण दिसून येते. त्यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी लोकांची वर्दळ असते. ते जिथे जातील, तिथे माणसांचे मोहोळ तयार होते. समाजाची तळमळ असणारे राजकीय नेते, रंजल्या-गांजलेल्यांचे प्रश्न मांडणारे जागरूक लोकप्रतिनिधी, आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर करून अडचणीत सापडलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारे मुख्यमंत्री, कलाकारांना प्रोत्साहन देणारे रसिक आणि घरातील प्रत्येकाची काळजी घेणारे कुटुंबप्रमुख अशी त्यांची अनेक रूपे वेगवेगळ्या लोकांना दिसली आहेत.
80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण ही बाळासाहेबांची शिकवण त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे. शिंदे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण देशात अल्पावधीत एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून नावलौकिक मिळविला आहे. अन्याय करणार नाही आणि अन्याय सहन करणार नाही, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण शिंदे यांनी प्रत्यक्षात आणली आहे. कणखर, संयमी व सर्वसमावेशक नेतृत्व असल्याने शिंदे यांनी चालविलेला कारभार भल्याभल्या राजकारण्यांना अचंबित करणारा ठरला. या सरकारने जनतेला दिलेला दिलासा, अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना विक्रमी वेळेत दिलेली मदत यामुळे काही महिन्यांतच शिंदे यांनी शेतकर्यांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न ते ज्या पद्धतीने हाताळत आहेत, त्यावरून त्यांचा कामातील कणखरपणा दिसतो. शेतकर्यांना मदत करण्यास सदैव तयार निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या वर्षी बळीराजा पुरता अडचणीत आला होता. अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि दररोज पिकांवर येणार्या निरनिराळ्या रोगांमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला होता. अशा शेतकर्यांना स्वातंत्र्यानंतर किंवा राज्याच्या निर्मितीनंतर इतक्या विक्रमी वेळेत मदत जाहीर होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ होती. एवढेच नव्हे, तर प्रत्येक वेळी सर्वसामान्य शेतकर्यांना प्रत्येक वेळी त्यांनी भरीव मदत दिली.शिंदे यांनी अनैसर्गिक असलेल्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वस्वी क्रांतिकारी होता. मुळामध्ये शिवसेना आणि भाजपची युती ही नैसर्गिक युती होती; मात्र शिवसेना पक्षाने महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय हा चुकीचा आणि महाराष्ट्राच्या जनतेवर चुकीच्या पद्धतीने लादलेला होता. शिंदे यांनी राज्यातील जनतेच्या मतांचा विचार करीत अनैसर्गिक युतीतून बाहेर पडत पुन्हा एकदा नैसर्गिक युतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. विरोधकांना विकासातून उत्तर देण्याची आणि प्रसंगी मोजक्याच शब्दांत विरोधकांना नामोहरम करण्याची त्यांची शैली भलतीच लोकप्रिय झाली आहे. उद्योग खात्याच्या माध्यमातून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून या माध्यमातून स्थानिकांना आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळत आहे. दावोस परिषदेतील आणलेली गुंतवणूक असो, की दर महिन्याला एक एमआयडीसी मंजूर करण्याचा धडाका पाहिला, तर त्यांना राज्य कुठे न्यायचे आहे, हे स्पष्ट होते. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने दावोस येथे जानेवारी महिन्यात ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’ आयोजित जागतिक अर्थ परिषदेत विविध उद्योगांसमवेत सुमारे तीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे झालेले करार पाहिले, तर काही काळातच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची होईल, यात कोणतीही शंका नाही. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास वाढला आहे.
आज संपूर्ण राज्याला शिंदे यांची ओळख ही ‘विकासपुरूष’ म्हणून झालेली आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारा ‘दृष्टीकोन’ त्यांच्याकडे असून विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील प्रत्येक भागाच्या विकासाकडे त्यांचे वैयक्तिक लक्ष आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम अत्यंत कमी वेळेमध्ये पूर्ण होण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. हा महामार्ग केवळ काही शहरांना जोडणारा महामार्ग नाही, तर या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्याही आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. या महाकाय प्रकल्पाच्या भूसंपादनाचे कठीण काम त्यांनी अवघ्या 18 महिन्यांच्या वेळेमध्ये पूर्ण केले. शिंदे हे गेली चार दशके सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत इतर सर्व नेत्यांपेक्षा वेगळी आहे. त्यांना वेळेचे, काळाचे असे काहीही बंधन नाही. दिवसभर शासकीय कामकाज आणि मध्यरात्री कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम ते करीत असतात. पहाटेही त्यांचे काम सुरू असते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जिद्द, मेहनत, स्व:कर्तृत्व याच्या जोरावर त्यांनी आपले स्थान निर्माण व मजबूत केले त्यांचा प्रवास हा थक्क करायला लावणारा आहेच; शिवाय शिंदे यांच्या आयुष्याचा आणि राजकीय वाटचालीचा प्रवास प्रत्येकासाठी, विशेषतः तरुणांसाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. शिंदे यांच्यामध्ये माणसे जोडण्याचा व टिकविण्याचा उत्तम गुण आहे. सत्ताधारी असो की विरोधक; प्रत्येक जण शिंदे यांच्या मेहनती स्वभावाचे कौतुक करतो.
Related
Articles
वाचक लिहितात
13 Sep 2024
अजय-अतुल यांच्या गीतांवर तरूणाईने धरला ठेका
12 Sep 2024
जीएनएसएस वापर केल्यास २० किलोमीटर मोफत प्रवास
11 Sep 2024
केजरीवाल आज नायब राज्यपालांना भेटणार
17 Sep 2024
विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज
16 Sep 2024
पाकिस्तानात मंकीपॉक्सचे पाच रुग्ण
16 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
सोने झळाळणार, वाहनांची घसरण
4
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
5
वाचक लिहितात
6
वाचक लिहितात