सहाव्यांदा व्याजदर कायम   

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज रेपो रेटसंदर्भात घोषणा केली. सहाव्यांदा आरबीआयने रेपो रेट तसाच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे यावेळीही रेपो रेट ६.५ टक्के इतका स्थिर राहणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने  या सदंर्भातील निर्णय घेतल्याचे जाहीर केले. कमिटीतील ६ सदस्यांपैकी ५ सदस्यांनी व्याजदर 'जैस थे' ठेवण्याच्या बाजूने मत दिल्यानंतर हा निर्णय अंतिम करण्यात आला.
 

विकासासोबत महागाईवरही लक्ष

 
यावेळी महागाई हा प्राधान्यक्रम असल्याची बाब शक्तीकांत दास यांनी अधोरेखित केली. “रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने कोरोना काळात अर्थव्यवस्थेमध्ये अधिक पैसा खेळता राहावा यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना कमी करण्यावर भर देण्यास एकमत दर्शवले. आर्थिक विकासाला हातभार लावतानाच महागाई नियंत्रणात आणण्यासाठी यामुळे मदत होईल”, असे शक्तीकांत दास पत्रकार परिषदेत म्हणाले.
 

पुढच्या आर्थिक वर्षासाठीचा महागाई दर…

 
यावेळी गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पुढील आर्थिक वर्षासाठीच्या महागाई दरावरही भाष्य केले. “पुढच्या आर्थिक वर्षात महागाईचा दर ४.५ टक्क्यावंर राहण्याचा अंदाज आहे. पहिल्या तिमाहीत ५ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ४ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.६ टक्के तर चौथ्या तिमानीह ४.७ टक्के दर राहील”, असा अंदाज शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला आहे.२०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर ७ टक्के इतका असेल, असाही अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला.
 

Related Articles