E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भारत-म्यानमार सीमेवरील सुरक्षेसाठी केंद्राने 'हा' करार केला रद्द
Samruddhi Dhayagude
08 Feb 2024
दिल्ली : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकारने काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला. त्यानुसार, भारत-म्यानमारच्या सीमेवर तब्बल १६४३ किमीचे कुंपण घालण्यात येणार आहे. त्यापुढे जाऊन सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय असा आहे 'फ्री मुव्हमेंट रिजीम' (Free Movement Rigime) म्हणजेच ‘मुक्त संचार व्यवस्था’ करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमित शाहांनी या संदर्भातील एक्सवर माहिती दिली. ते म्हणाले, देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या भारताच्या ईशान्येकडील राज्यांची लोकसंख्याशास्त्रीय संरचना राखण्यासाठी भारत आणि म्यानमारमधील 'फ्री मूव्हमेंट रेजिम' (FMR) रद्द करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने (MHA) घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालय सध्या ते रद्द करण्याच्या प्रक्रियेत असल्याने, MHA ने FMR तात्काळ निलंबित करण्याची शिफारस केली आहे.
FMR म्हणजे काय?
भारत आणि म्यानमार दरम्यान १,६४३ किमींची सीमा असून या सीमेवर मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश हे चार राज्य आहेत. दोन्ही देशांनी १९७०मध्ये मुक्त संचार व्यवस्थेचा (FMR) करार मान्य केला. यामुळे सीमा भागातील आदिवासी जमातींना दोन्ही देशांमध्ये १६ किमीपर्यंत व्हिसाशिवाय मुक्तपणे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. परंतु, हा करार आता रद्द करण्यात आला आहे.
म्यानमारमध्ये बंडखोर गट आणि लष्करात संघर्ष सुरू आहे. तसेच, नोव्हेंबर महिन्यात भारतात जवळपास ६०० लष्कर घुसले होते. या प्रकरणी मिझोराम सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितली होती. सप्टेंबर महिन्यात मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी गृह मंत्रालयाला अवैध घुसखोरी रोखण्यासाठी एफएमआर प्रणाली रद्द करावी, अशी शिफारस केली होती. म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालण्याच्या कामाला गती देण्यात येत आहे असे ही त्यांनी म्हटले होते. मणिपूरची म्यानमारशी ३९० किमी लांबीची सीमा आहे. यापैकी केवळ १० किमीच्या कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे.
या करारामुळे अनवधानाने अवैध स्थलांतर, अमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रास्त्रांचा व्यापार होत असल्याची टीका केली जात होती. इंडो-म्यानमार दरम्यानची सीमा दाट जंगल आणि असमान भूपरिस्थितीतून (मैदानी प्रदेश नसलेली) जाते. सीमेवर खूप कमी भागात कुंपण घातलेले असल्यामुळे सीमेवर नजर ठेवण्यास कठीण जाते.
Related
Articles
सर्वोच्च न्यायालयाकडून नव्याने तपास करण्याचे निर्देश
04 Oct 2024
कर्णधार शान मसूदचे दीडशतक
09 Oct 2024
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ’एआय’ कॅमेर्यांची करडी नजर
03 Oct 2024
कुंभमेळ्यादरम्यान मद्य आणि मांस विक्रीवर बंदी : योगी
07 Oct 2024
मेक्सिकोच्या आखातात वादळाची निर्मिती
07 Oct 2024
सकाळच्याच सत्रात मंदिरात झाली घटस्थापना
04 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अभिजात’ मराठी (अग्रलेख)
2
इराणला किंमत चुकवावी लागेल
3
स्कूल व्हॅनचालकाचा मुलींवर अत्याचार
4
वाचक लिहितात
5
विकृतीला चाप
6
अटीतटीची लढत (अग्रलेख)