सोरेन यांच्या ईडी कोठडीत वाढ   

रांची : कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत विशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी पाच दिवसांची वाढ केली.
 
सोरेन यांना 2 फेब्रुवारी रोजी सुनावलेली ईडी कोठडीची मुदत काल संपणार होती. त्यामुळे सोरेन यांना विशेष पीएमएलए (आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी ईडीने सात दिवसांची कोठडी मागितली. त्यास, सोरेन यांच्या वकीलांनी विरोध केला. न्यायालयाने पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली, असे वकील राजन रंजन यांनी पत्रकारांना सांगितले.
 
आर्थिक अफरातफर प्रकरणात सात तासांच्या चौकशीनंतर 31 जानेवारीच्या रात्री ईडीने सोरेन यांना अटक केली होती. तत्पूर्वी, सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधिमंडळ नेतेपदी चंपई सोरेन यांची निवड झाली. 
 

Related Articles