माजी मंत्री हरकसिंग रावत यांच्या ठिकाणांवर ईडीचे छापे   

डेहराडून : उत्तराखंडचे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हरकसिंग रावत यांच्या घरासह एक डझनहून अधिक ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी छापे घातले. कथित वन गैरव्यवार प्रकरणात रावत आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांची ईडीने काल झाडाझडती घेतली.पंचकूलासह दिल्ली, चंडीगढ आणि उत्तराखंडातील अनेक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. हरयाच्या पंचकूलातील सेक्टर 25 मध्ये डॉ. विवेक आणि डॉ. विक्रम यांच्या घरावरही ईडीने छापा घातला. 
 
काल सकाळी सात वाजता ईडीचे पथक एकाच वेळी 17 ठिकाणी दाखल झाले. यामध्ये हरक सिंग यांच्या दिल्लीतील दोन ठिकाणांचा समावेश होता. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातंर्गत (पीएमएलए) ही कारवाई करण्यात आली.2022 च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी रावत यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.भाजप सरकारमध्ये असताना रावत वनमंत्री होते. रावत यांच्या कार्यकाळात हजारो वृक्षे तोडून तेथे इमारती उभरण्यात आली होती.
 

Related Articles