नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडत नितीश कुमार नुकतेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाले. त्यानंतर, त्यांची पंतप्रधानांसोबतची ही पहिलीच भेट होती. नितीश कुमार यांनी बिहारमधील महाआघाडीतून बाहेर पडताना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, भाजपला सोबत घेत पुन्हा सरकार स्थापन केले.
Fans
Followers