प्रयागराज : ज्ञानवापी संकुलातील पूजा पूर्वीच्या आदेशाप्रमाणे सुरूच राहणार आहे. कारण अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी पूजेला परवानगी देऊ नये, अशी मागणी करणार्या आव्हान अर्जावरील सुनावणीला स्थगिती दिली आहे. ती आता 12 फेब्रुवारी रोजी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदू पक्षांना ज्ञानवापीत पूजा करण्यास परवानगी दिली होती; परंतु अंजूमान इंतेझामिया मशीद समितीने पूजा करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारा आव्हान अर्ज गेल्या शुक्रवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केला होता. पण, त्यावर सुनावणी न्यायालयाने स्थगित केली आहे.
Fans
Followers