श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून नागरिकाची हत्या   

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर शहरात शीख धर्मीय व्यक्‍तीची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. दुसर्‍या एका घटनेत अन्य एकजण जखमी झाला. या हल्ल्याचा निषेध नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी केला आहे.
 
श्रीनगरच्या हब्बा कादल परिसरात बुधवारी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यात पंजाबचा एक मजूर ठार झाला असून दुसरा जखमी झाला आहे. अमृतपाल सिंग, असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. तो अमृतसरचा रहिवासी आहे.  सायंकाळी 7 वाजता दहशतवाद्यांनी दोघांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या होत्या. घटनास्थळी सिंग यांचा मृत्यू झाला तर रोहित हा दुसरा मजूर जखमी झाला आहे. तो देखील अमृतसरचा रहिवासी होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गोळीबार झाल्याचे एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.  दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्‍ला आणि ओमर अब्दुल्‍ला यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. समाजात हिंसेला आणि दहशतवादाला कोणतेेही स्थान नाही. निघूर्र्ण हत्त्येचा आम्ही निषेध करत आहोत. 
 

Related Articles