चांगले काम करणार्‍याला सन्मान मिळत नाही!   

नवी दिल्ली : काही नेते ना डावे ना उजव्या विचारसरणीचे असतात. ते केवळ संधिसाधू असतात. जो पक्ष सत्तेत आहे. त्यालाच ते पसंती देतात. निष्ठावान नेते किंवा स्वतःच्या मूळ विचारसरणीवर ठाम असणार्‍या नेत्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. कोणताही पक्ष सत्तेत असो, जो चांगले काम करतो त्याला क्वचितच मान-सन्मान मिळतो, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले. 
 
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, कोणत्याही पक्षाचे सरकार असो. एक गोष्ट पक्की आहे की जो चांगले काम करतो त्याला सन्मान मिळत नाही. दुसरीकडे जो वाईट काम करतो त्याला शिक्षा होत नाही. नेत्यांच्या विचारसरणीमध्ये झालेली घसरण लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही. असेही नेते आहेत जे आपल्या विचारसरणीवर कायम आहेत. पण, त्यांची संख्या आता कमी होत आहे.  संसद सदस्यांमुळे लोकतंत्र गुणवत्तापूर्ण बनत असते. पण, आज आपली समस्या नेत्यांमध्ये मतभेद हे नसून विचारधारेमध्ये आलेली शून्यता आहे.
 

Related Articles