तामिळनाडूतील पंधरा माजी आमदार आणि एक माजी खासदार भाजपमध्ये   

नवी दिल्ली : तामिळनाडूतील 15 माजी आमदार आणि एका माजी खासदारासह अनेक नेत्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्यांनी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि एल मुरुगन आणि प्रदेश भाजप अध्यक्ष के अन्नामलाई यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व घेतले. 
 
के. वडिवेल, पी.एस. कंदसामी, माजी मंत्री गोमथी श्रीनिवासन, आर. चिन्नास्वामी, आर. दुराईसामी, एम.व्ही.रत्नम, एस.एम.वासन, एस. मुथुकृष्णन, पी.एस. अरुळ, एन.आर. राजेंद्रन, आर. थंगारसू, गुरुनाथन, व्ही.आर. जयरामन, बालसुब्रमण्यम, चंद्रशेखर अशी भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या नेत्यांची नावे आहेत. 
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी पक्ष दक्षिणेकडील राज्यात आपले स्थान मजबूत करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. भाजपमध्ये सामील होणारे हे बहुतेक नेते भाजपचे माजी सहयोगी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे (एआयएडीएमके) आहेत. त्यांचे स्वागत करताना अण्णामलाई म्हणाल्या की, भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असून, मोदी सलग तिसर्‍यांदा सत्तेवर येतील.
 

Related Articles