ईशा देओलचा घटस्फोट   

मुंबई : अभिनेत्री ईशा देओलचा घटस्फोट झाला आहे. पती आणि उद्योगपती भारत टाखटानी यांच्यापासून ती विभक्‍त झाली आहे. संमतीने घटस्फोट घेण्यात आल्याचे दोघांकडून सांगण्यात आले. 
 
अकरा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासूनते घटस्फोट घेण्याच्या विचारात असल्याच्या बातम्या समाज माध्यमांवर येत होत्या. राध्या आणि मिराया अशा दोन मुली त्यांना आहेत. स्वत:चे हित आणि कल्याणासाठी तसेच खासगी आयुष्य जपण्यासाठी घटस्फोटचा निर्णय घेतल्याचे ईशा आणि भारत यांनी सांगितले आहे. ईशा देओल ही प्रख्यात अभिनेत्री हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची कन्या आहे. भारतसोबत तिने 29 जून 2012 रोजी विवाह केला होता.
 

Related Articles