इंधनाचे दर कमी होणे अशक्य !   

कंपन्यांना डिझेलवर प्रतिलिटर तीन रुपयांचा तोटा

 
नवी दिल्‍ली : पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर बदलून जवळपास दोन वर्षे झाली आहेत. एप्रिल 2022 मध्ये अर्थमंत्र्यांनी इंधनावरील अबकारी करात कपात केली होती. यामुळे पेट्रोलमागे 8 रुपये आणि डिझेलमागे 6 रुपयांनी कमी झाले होते. पण, आता कंपन्यांना डिझेलवर तीन रुपयांचा तोटा होत असून पेट्रोलचा नफा कमी झाला  आहे. 
 
गेल्या दोन वर्षांपासून पेट्रोल, डिझेलच्या विक्रीवर दणकून नफा कंपन्यांनी कमावला होता. पण, त्या काही इंधनाचे दर कमी करण्याचे नाव घेत नाहीत. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकार पेट्रोल, डिझेलचे दर चार रुपयांनी कमी करणार असल्याचे सांगितले होते. परंतु, आता ते शक्य होणार नाही, असे दिसते. 
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे दर भडकले आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या तोट्यात जात आहेत. डिझेलमागे प्रतिलिटर तीन रुपयांचा तोटा होत असून पेट्रोलच्या फायद्यामध्ये घट झाली आहे. यामुळे कंपन्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत कपात करण्यास कचरत आहेत. पेट्रोलवरही कंपन्यांचा फायदा तीन ते चार रुपये प्रतिलिटरवर आला आहे. 
 
पेट्रोल, डिझेलमागे कंपन्यांना फायदा होत होता. त्यातच भारतीय कंपन्या रशियाकडून स्वस्त दरात क्रूड तेल उचलत होत्या. ’’तेल कंपन्या सर्व आर्थिक पैलूंचा विचार करून निर्णय घेतात. सरकार दर ठरवत नाही.’ असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले होते.
 

Related Articles