इन्फोसिसशी संबंधाचा आरोप   

सुनक यांची चौकशी होणार 

 
लंडन : ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक इन्फोसीस कंपनीमुळे संकटात सापडले आहेत. त्यांची पत्नी आकांक्षाकडे इन्फोसिस कंपनीची धुरा आहे. त्यामुळे सरकारचे आणि कंपनीचे लागेबांधे आहेत का ? याबाबत आता तपास केला जाणार आहे. 
 
इन्फोसिसचे कार्यालय बंगळुरू येथे आहे. ब्रिटनचे वाणिज्य मंत्री डोमनिक जॉनसन यांनी नुकतीच कार्यालयाला भेट दिली होती. तेथे काय चर्चा झाली ? याचा मागोवा घेतला जाणार आहे. आकांक्षा यांचे इन्फोसिसमध्ये 91 टक्के समभाग आहेत. त्यांची किमत 500 दशलक्ष पाउंड आहे. गेल्या वर्षी लाभांशापोटी त्यांना 13 दशलक्ष पाउंड वडील नारायण मूर्ती यांच्याकडून प्राप्‍त झाले होते. त्यामुळे सुनक हे ब्रिटनचे सर्वात श्रीमंत पंतप्रधानांच्या पंगतीत जाऊन बसले आहेत. जॉनसन यांनी गेल्या वर्षी घोषणा केली होती की, ब्रिटननमध्ये इन्फोसिसला हव्या त्या सुविधा देणार आहोत. तसेच सरकारतर्फे लागेल ती मदत केली जाईल, असे सांगितले होते. आता या  प्रकरणी सरकार आणि इन्फोसिस यांच्यात काही लागेबांधे आहेत का ? याची चौकशी केली जाणार असल्याचे वृत्त आहे. 
 

Related Articles