सुहास दिवसे नवे जिल्हाधिकारी   

पुणे : पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सुहास दिवसे यांची नियुक्‍ती डॉ. राजेश देशमुख यांच्या जागी करण्यात आली आहे. तर डॉ. देशमुख यांची क्रीडा व युवक सेवा आयुक्‍तपदी बदली करण्यात आली.
 
सचिव दर्जाच्या पुण्यातील 3 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. विशेष म्हणजे त्यांची नियुक्‍ती पुण्यातच करण्यात आल्या. या पार्श्‍वभूमीवर पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी कोणाची नियुक्‍ती होणार याबाबत विविध नावांची चर्चा होती. त्यामध्ये दिवसे यांच्या नावाचा समावेश होता. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून दिवसे यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येते.            
 
दिवसे यांनी प्रोफेशनरी उपजिल्हाधिकारी म्हणून 1995 मध्ये पुण्यात सुरुवात केली. त्यानंतर खेडचे प्रांतधिकारी, जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी, अन्‍नधान्य वितरण अधिकारी, महसूल उपायुक्‍त, पीएमआरडी आयुक्‍त त्यानंतर पुण्यातच क्रीडा आणि युवक आयुक्‍त पदावर कार्यरत होते. ही सर्व सेवा पुणे शहरात झाली आहे. त्यानंतर, दिवसे यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.

Related Articles