E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
धायरी येथे कार्यालयाला आग; जीवितहानी नाही
Samruddhi Dhayagude
08 Feb 2024
पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा परिसरात असलेल्या एका इमारतीतील कार्यालयात आग लागल्याची घटना बुधवारी घडली. आगीत कार्यालयातील संगणक, विद्युत उपकरणे, तसेच अन्य साहित्य जळाले. कार्यालय बंद असल्याने गंभीर दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पंधरा ते वीस मिनिटांत आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली
धायरी फाटा परिसरात तीन मजली ओम पॅलेस ही इमारत आहे. इमारतीत पहिल्या मजल्यावर सृष्टी डिझायनर या कंपनीचे कार्यालय आहे. कार्यालयात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या सिंहगड रस्ता केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्यालय बंद असल्याने जवानांनी रहिवाशांकडून चावी घेतली. कार्यालयात कोणी अडकले नसल्याची खात्री जवानांनी केली. त्यानंतर जवान नरेश पांगारे, नीलेश पोकळे, अजित शिंदे, विक्रम मच्छिंद्र, दिग्विजय नलावडे यांनी पाण्याचा मारा करून पंधरा ते वीस मिनिटांत जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीत संगणक, प्रिंटर, लाकडी सामान, विद्युत उपकरणे, तसेच अन्य साहित्य जळाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता जवानांनी व्यक्त केली.
Related
Articles
इरई धरण परिसरात परदेशी पक्ष्यांचे आगमन
06 Jan 2025
शरद पवारांचे खासदार फोडण्याचे प्रयत्न?
09 Jan 2025
देशात लवकरच बुलेट ट्रेन धावणार : मोदी
07 Jan 2025
डुडुळगाव येथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई
10 Jan 2025
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर इंग्लंडकडून बहिष्कार?
08 Jan 2025
‘पीएम केअर्स’ फंडाकडे लोकांची पाठ
06 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)