न्यूझीलंड अव्वल स्थानावर   

विलिंगटन : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी 9 संघांमध्ये लढत सुरू आहे. जागतीक अजिंक्यपद कसोटीमध्ये फक्त गुणतक्त्यामधील अव्वल संघांना संधी मिळते. दरम्यान, डब्ल्यूटीसीच्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना जिंकून दुसर्‍या स्थानावर पोहोचले होते, पण आता पुन्हा एकदा ते अव्वल 2 मधून बाहेर पडले आहे.
 
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना किवी संघाने म्हणजेच न्यूझीलंडने 281 धावांनी जिंकला होता. या सामन्यातील विजयासह तो डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंड अव्वल स्थानावर आल्याने भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांची घसरण झाली. भारत आता दुसर्‍या स्थानावरून तिसर्‍या स्थानावर पोहोचली आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावरून दुसर्‍या स्थानावर गेला आहे. न्यूझीलंडचा संघ आता अव्वल स्थानी पोहोचला आहे.
 
डब्ल्यूटीसीच्या या सायकलमध्ये न्यूझीलंड संघ एकूण तीन सामने खेळला आहे. जिथे त्यांनी दोन सामने जिंकले आणि केवळ एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंड संघ 66.66 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. पहिल्या जागतिक कसोटीमधील संघ न्यूझीलंडने या सायकलमध्ये चांगली सुरुवात केली आहे. डब्ल्यूटीसीच्या दुसर्‍या सायकलमध्ये त्यांना सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
 

Related Articles