भारताच्या श्रीवल्ली, ऋतुजा यांचे विजय   

मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल एण्ड टी मुंबई खुल्या डब्लूटीए एक लाख 25 हजार डॉलर रकमेच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती, ऋतुजा भोसलेने दुसरी फेरी गाठली. दुहेरीत भारताच्या प्रार्थना ठोंबरेने नेदरलँडच्या अरियानी हॉर्तोनोच्या साथीत विजयी सलामी दिली.
 
क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्तीने जपानच्या दुसर्‍या मानांकित नाओ हिबिनोचा टायब्रेकमध्ये 2-6, 6-1, 7-6 (5) असा पराभव केला. भारताच्या ऋतुजा भोसलेने थायलंडच्या पेंगतारण प्लीपुचचा 6-4, 7-5 असा, हंगेरीच्या दालमा गल्फीने सातव्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या किंबर्ली बायरेईलचा 6-2, 4-6, 7-5 असा तर जपानच्या मोयुका उचीजिमाने फ्रान्सच्या कॅरोल मोनेटचे आव्हान 6-3, 6-3 असे संपुष्टात आणले.
 
 दुहेरीत भारताच्या प्रार्थना ठोंबरेने नेदरलँडच्या अरियानी हॉर्तोनोच्या साथीत थायलंडच्या लुकसिका कुमखुम व पेंगतारण प्लीपुच या चौथ्या मानांकित जोडीचा 6-4, 2-6, 10-6 असा पराभव करून दुसर्‍या फेरीत प्रवेश मिळविला.निकाल :एकेरी : पोलीना कुडेरमेतोव्हा (रशिया) वि.वि. एनास्तेसीया झाकरोवा (रशिया) 7-6 (8), 6-0; एरिना रोडीनोव्हा (ऑस्ट्रेलिया) वि.वि. सुझेन लामेन्स (नेदरलँड) 6-2, 7-5; अमनदिनी हासे (फ्रास) वि.वि. लीना ग्लूशको (इस्राईल) 6-1, 6-1; कॅमिला रोसटेलो (इटली) वि.वि. एनास्तेसीया तिखोनोव्हा (रशिया) 7-5, 3-6, 6-2; दालमा गल्फी (हंगेरी) वि.वि. किंबर्ली बायरेईल (ऑस्ट्रेलिया) 6-2, 4-6, 7-5. दुहेरी : कॅरोल मोनेट (फ्रास) व एकतेरिना याशीना (रशिया) वि.वि. व्हॅलेंटिनी ग्रामटीकोपोलु (ग्रीस) व दरजा सेमेनिस्तजा (लात्विया) 7-6 (7), 6-4.

Related Articles