E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
कृष्ण भक्तीचा ध्यास घेतलेल्या संत प्रेमाबाई
Samruddhi Dhayagude
08 Feb 2024
विचारधन :प्रा. डॉ. प्राची गडकरी
संत साहित्याच्या अभ्यासक
मुक्ताबाई किती सहजपणे चांगदेवांना म्हणाल्या की...
शुद्ध ज्याचा भाव झाला ।
देव नाही दूर त्याला॥
म्हणजे भाव शुद्ध झाला की देवाची भेट होते. हे मुक्ताईंनी सांगीतले खरे! पण हा शुद्ध भाव म्हणजे काय? तो कसा निर्माण करायचा? तो कुठून आणायचा? भक्तीमध्ये सापडू शकेल का हा भाव? मग भक्ती कोणत्या देवाची करायची! असे असंख्य प्रश्न संत प्रेमाबाईंना सतावत होते.
भक्ती मन आणि शुद्धता याचे कोडे संत प्रेमाबाईना काही केल्या सुटत नव्हते. माणूस कितीही म्हणाला मी शुध्द भावनांचा आहे. माझ्यामध्ये कणभरही अहंकार नाही. किंवा अजिबात ताठा नाही. पण हे सांगताना सुध्दा त्याच्या मनात तोच कुठेतरी अहंकार डोकावतच असते. म्हणुन संत प्रेमाबाई म्हणायच्या तुम्ही काहीच सांगू नका तुम्ही कसे आहात? तुमच्यात काय काय आहे ते? आणि कोणकोणत्या गोष्टी तुमच्यात नाही ते!
कारण तुमच आचरण आणि बुद्धीच समोरच्याला सारकाही सांगत असते, की तुम्ही कसे आहात ते!
प्रेमाबाईं म्हणायच्या अहंकार वाटायला नेहमी पैसा अडका जमिनजुमला, सौंदर्य लागतच असं काही नाही.अहो शुकदेवांना तर स्वतःच्या दिगंबर अवस्थेतील घोर वैराग्याचा क्षणभर अहंकार झाला होता. ही अहंकाराची आडवी रेष ओळखूनच व्यासांनी आपल्या मुलाला म्हणजेच शुकदेवांना जनक राजाच्या भेटीसाठी पाठवले होते. ’संगम: तत्व सुखी भव :’ ह्या गुरू जनकाच्या निरोपामुळे कळले ‘मी’चा संग सोडायला हवा!
प्रेमाबाईंनी आपले भाव शुध्द भाव होण्यासाठी जणू नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीला आपलेसे केले होते. कृष्णलीला ऐकणे आणि तासनतास कृष्णावर भजन करीत बसणे हा त्यांच्या भक्तीचा भाग होता.
महपतीबुवा ताहराबादकरांनी संत प्रेमाबाई यांचे चरित्र रसाळ भाषेत वर्णिले आहे. वारकरी संप्रदायातील ह्या स्त्री संत नित्यनेमाने भागवत श्रवण करायच्या! एकतर बालविवाह आणि लगेच एका मुलाचा जन्म झाल्यावर पतीचे निधन झाले. अपशकुनी, पांढर्या पायाची अशा अनेक टोचण्या समाजाकडून मिळाल्याने जीवनात घोर नैराश्य आले होते. त्यामुळे त्यांनी भक्तीमार्ग स्वीकारला.
त्यांच्या प्रत्येक अभंगाला कारूण्याची छटा आहे. आपल्या अभंगात ’गडे’ हा शब्द वापरून त्यांनी कृष्णावरील आपले प्रेम व्यक्त केले आहे.
गडे हो कृष्ण गडी आपुला।
यमुना डोही बुडाला॥
भागवतातील कृष्णलीला त्यांनी आपल्या अभंगात रेखाटल्या आहेत. गावापासून दूर वावरतात रहाणार्या प्रेमाबाई हाडाच्या प्रेमळ असल्याने दारावरून जाणार्या प्रत्येक वाटसरूला गुळपाणी देऊन अतिथी धर्माचे पालन करत होत्या. रोज पशुपक्षांसाठी खास पाणी ठेवून आपल्या घासातला घास काढून त्या साधू, याचक, गरजूंना मदत करत होत्या. कोणीही त्यांच्या दारावरून कधीच विन्मुख गेले नाही. राग, क्रोध, त्रागा हे शब्द त्यांच्या कोशातच नव्हते.
श्रवणालागी पाठविला बाळ ।
प्रपंच धंदा सारित सकळ ॥
परि हरिच्या चरित्राजवळ।
वृत्ती तत्काळ वेधली॥
हा प्रेमाबाईंचा चौदावा अभंग आहे. केवळ एकच दिवस प्रेमाबाईंनी स्वतः घरी राहून आपल्या दहा वर्षांच्या मुलास भागवत सप्ताचे श्रवण करायला पाठवल्या नंतर मनाला लागणारी हुरहूर त्यांनी ह्या अभंगांत मांडली आहे. देव आवडणे किंवा देवाच्या गोष्टी कानावर पडणे ह्याला भाग्य लागते. ह्या चौदाव्या अभंगात कीर्तनास न जाण्याचे कारण स्पष्ट करताना त्या म्हणतात की रोजच्या सवयी प्रमाणे सकाळची सगळी कामे आटोपून भागवत सप्ताहाला जायला निघाले तोच दारात साधूंसंताचा तांडा आला. आज सप्त्याचा तिसरा दिवस आणि तिसर्या दिवशी भागवतकार श्री कृष्णाच्या बाललीला सांगणार होते. खरंतर ह्या बाललीला कैक वेळा त्यांनी श्रवण केल्या होत्या. त्यावर अभंग सुध्दा लिहिले होते. तरीही सूर्याची किरणे जशी रोज नवी वाटतात तशा त्यांना कृष्णलीला रोज नाविण्यपूर्ण वाटे. पण दारात साधूसंत वारकरी पाहून त्यांना आचारधर्म आठवला आणि अतिथी देवो भव: म्हणत त्यांनी स्वयंपाक रांधायला घेतला. त्या दिवशी आपल्या दहा वर्षांच्या मुलास त्यांनी सप्ताहाला पाठवले आणि प्रवचनातील शब्द न शब्द घरी आल्यावर सांगायचा असे मुलाकडून वचन घेतले. प्रेमाबाईंच्या हातचे गरम गरम पिठले भाकरीने तृप्त झालेले वारकरी अंगात पहुडले असतानाच मुलगा प्रवचनावरून परत आला आणि बुवांचे प्रवचन भारावून आईस सांगू लागला. चार वर्षाच्या खोडकर कृष्णास कसे यशोदामैयाने उखळीस बांधले हे सांगताना प्रेमाबाई हमसाहुमशी रडू लागल्या. कृष्णाला किती यातना झाल्या असतील ह्या विचाराने त्या अस्वस्थ झाल्या.खरतर कैक हजार वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट परंतु त्या कृष्णाच्या वेदना त्या अनुभव लागल्या आणि ताडकन उठून मुलाला व वारकर्यांना म्हणाल्या मला कृष्णाला उखळीतून सोडवायला गेले पाहिजे. मला यशोदेची माफी मागायला हवी. संपूर्ण साधूसंतांसमोर त्यांनी आपल्या मुलाचा शेवटचा निरोप घेतला आणि दोन्ही हात वर करून कृष्णा मी आले तुला सोडवायला असं म्हणत तिथेच प्राण सोडला. द्वापारयुगातील कृष्णाच्या मदतीला धावून गेलेल्या प्रेमाबाईंची भोळी भक्ती म्हणजे भक्तीचा उच्चांक आहे, असे म्हणताना महिपती बुवा सांगतात की मागून कधीच मरण मिळत नाही. पण साक्षात मृत्यूला वश करणे ह्या सारखी समाधी अवस्था स्त्री संत साहित्यात लाभलेल्या एकमेव संत प्रेमाबाई आहेत. आजही प्रेमाबाईंची पारंपारिक गीते भजने केवळ महाराष्ट्रातच नाही तर गोवा कारवार येथे गायली जातात.
संत प्रेमाबाई लहानपणापासूनच ईश्वरभक्तीकडे वळल्या. त्यांचे संपूर्ण चरित्र म्हणजे करूण रसाचा कारूण्यपूर्ण प्रवाहच होय. त्यांचे संपूर्ण आयुष्य अत्यंत सत्व संपन्न होते. भक्ती म्हणून त्या भागवत श्रवण करीत त्यांचे आयुष्य त्यांनी वैधव्यात घालवले. त्यांची भक्ती अनन्यसाधारण होती. भक्तीच्या सामर्थावर त्यांनी भगवंतास आपलेसे करून घेतले. त्यांच्याजवळ अप-पराभाव कोठेही नव्हता. संत प्रेमाबाईच्या मनात भूतदया अखंड प्रवाहीत होती. त्या नित्य गोदावरीस्नान, हरिकीर्तन, विठ्ठल भक्ती, भागवत श्रवण करीत असत. त्यांच्याकडे साधू संताचा मेळा वैष्णवजन भोजनास येत. पुराण ऐकण्यास बसल्या की, त्यांच्या डोळ्यातून
अश्रुधारा वाहत असे. त्यांच्या या स्वभावास अनुसरूनच त्यांना प्रेमाबाई म्हणत. त्यांचा काळ 1658च्या सुमारास समजला जातो. गोदावरी नदीकाठावर एका गावात त्या राहात असत. महिपतीबुवा ताहराबादकर यांच्या भक्तीलीलामृत या चरित्रग्रंथात 42 व्या अध्यायात त्यांचे पद्य स्वरूपातील अल्प चरित्र उपलब्ध आहे.
Related
Articles
गेल्या दहा वर्षांत लोकशाही नष्ट करण्यासाठी प्रयत्न : खर्गे
16 Sep 2024
भारत-चीनमध्ये नागरी विमान वाहतूक सहकार्यावर चर्चा
13 Sep 2024
आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची राहुल यांची मागणी मान्य आहे?
16 Sep 2024
नीरज चोप्रा दुसर्या स्थानावर
16 Sep 2024
वाचक लिहितात
13 Sep 2024
पूर्व जर्मनीत पूल कोसळला
15 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
सोने झळाळणार, वाहनांची घसरण
4
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
5
वाचक लिहितात
6
वाचक लिहितात