व्हॉट्सऍप कट्टा   

लहानपणी भावंडामध्ये असलेले प्रेम शेवटपर्यंत टिकवता आले तर? ते जीवन किती आनंदमय असेल! याची कल्पना जरी केली तरी आतून  आनंद आणि समाधान उसळी मारते! ज्यांना हे प्रत्यक्षात उतरवता आले ती  भावंडे आणि त्यांना जन्म देणारे  आईवडील खरोखरच भाग्यवान आहेत. 
 
पोटचे आले की पाठच्याचा विसर पडतो आणि ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांची परवड सुरू होते. असे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे, याचे कारण आपली कुटुंब व्यवस्था पूर्ण कोलमडून गेली आहे, संवाद संपला आहे, आपले दुःख व्यक्त करायला जवळचे कोणीच नाही, असा भाव तयार होऊ लागला आहे. यामुळे माणूस एकलकोंडा होऊन मनोरूग्ण बनू लागला आहे, याचा शेवट आनंद हरवून फक्त नैराश्य उरले आहे आणि मी काय मिळविले? याचे उत्तर शून्य आहे. हे शून्य मोठे असले काय आणि छोटे असले काय त्याचे मूल्य समान आहे. आपण जसा कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, तसा भावंडांनाही वेळ दिला पाहिजे, स्वतःला प्रश्न विचारून पहा. कोणतेही काम नसताना आपण आपल्या बहिणीकडे किंवा भावाकडे सहज भेटायला किती वर्षे गेलो नाही? मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही. खाऊच्या एका घासासाठी पाठीत धपाटा मारणारी मोठी बहीण, चिमटा काढून पळून जाणारी धाकटी बहीण, आपण बाहेरून आलो तर काहीतरी आणले असेल म्हणून खिशाकडे, हाताकडे पाहणारा धाकटा भाऊ, आजही तसेच आहेत फक्त आपला भाव आणि स्वभाव बदलला वय कितीही होऊ द्यात थोरल्याने अधिकार गाजवलाच पाहिजे आणि धाकट्याने हट्ट केलाच पाहिजे. 
 
आपण जेथे असू तेथे आपली भूमिका आपल्याला पार पाडता आली पाहिजे. हे शक्य आहे त्यासाठी... वर्षातून किमान एकवेळ पूर्ण एक दिवस सर्व भावंडांनी एकमेकांसाठी द्या. त्यादिवशी आपले आईवडील आणि आपली भावंडे मिळून एक दिवस एकत्र येऊन, एक दिवसाची सहल आयोजित करा, कुवत असेल त्याने सर्व खर्च करा, कुवत नसेल तर सगळ्यांनी मिळून करा, ते ही शक्य नसेल, तर तो एक दिवस सुट्टी घेऊन फक्त सर्व भावंडे आईवडिलांसोबत राहा आणि अनुभव घेऊन पाहा... हा अनुभव आणि आईवडील व भावंडांच्या चेहर्‍यावरील समाधान शब्दात वर्णन करता येणार नाही. 
 
मी स्वतः हा प्रयोग नुकताच करून पाहिला आम्हा सर्वांना आपले आयुष्य वाढल्याचा भास झाला.कितीतरी दिवसांनी सर्वांनी मनमुराद आनंद लुटला.  सर्व बाजूने काट्यासारखे टोचणारे जीवन, त्यावर त्या एका दिवसाने अलगद फुलांचा आल्हाददायक वर्षाव केला. कुटुंब व्यवस्थेची किंमत कळाली आणि रक्ताच्या नात्याची गाठ नव्याने उमगली माझे कोणीतरी आहे याची जाणीव झाली आणि वडिलांना काय पाहिजे हे त्यांना व्यक्त न करता समजले. 
 
या गोष्टी पैसे देऊन, हिस्सा घेऊन, वाटणी करून कोणालाही मिळविता येणार नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही वेगळे राहणार नाही ही प्रतिज्ञा भावांनी केली आणि प्रत्यक्षात अमलात आणली तर त्यांना जन्म देणार्‍या आई-वडिलांइतके भाग्यवान जगात कोणीही नाही. हे अवघड आहे, पण अशक्य मात्र निश्चित नाही... 
हेच रामराज्य आहे आणि असे घर आजही अयोध्या आहे.
 
नवा डाव
 
दाटलेल्या आभाळात
साठलेले काय काय
त्याचे त्याला सोसवेना
कोसळतो धाय धाय!....
 
कोंदाटल्या दाही दिशा
शहारल्या ओल्या वाटा
आवरता सावरता
धरतीचा जीव  पिसा....
 
पाने फुले झाडे वेली
धारा सर्वांगी झेलती 
साहताना शिरशिरी
जाती शिणून जराशी....
 
जळ वाहे खळखळ
ओसंडून जाते घळ
कसा पेलावा आवेग
शेतमळ्यांना सवाल.....
 
नदी नाले ओसंडून
जाती ओलांडून तीर
सांभाळावा कसा वेग
नाही उसंत क्षणैक.....
 
सैरभैर वाहतात
दाही दिशांतुन ओघ
विसावतात थकून
समिंदराच्या कुशीत.....
 
विरामेल यथाकाळ
वर्षेचा हा सारा खेळ
नवजीवन फुलेल
पटावर नवा डाव.....
 
-  शुभांगी जुमडे
मो. : 9604345325
----
बायकोला समजून घेणं म्हणजे :
32 जीबी चा व्हिडीआ डाऊनलोड करणं. आणि...
31.5 जीबी डाऊनलोड झाल्यावर एरर  मेसेज दिसणं!
जगात केवळ तेच लोक साधेभोळे असतात, ज्याच्या मोबाइलमध्ये पासवर्ड नसतात. 
एका सर्व्हेनुसार, आजही आपल्या देशात......
’तू प्यार है, किसी और का, तुझे चाहता कोई और है’
हे गाणं वाजल्यावर 10 पैकी 8 मुलं इमोशनल होऊन जातात...
लोक इतके टॅलंटेड असतात की, 
गाड़ी हालवून सांगू शकतात की गाडीत पेट्रोल किती आहे ?

Related Articles