फिलिपाईन्समध्ये दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू   

मनिला : फिलिपाईन्समध्ये सोन्याची खाण असलेल्या गावात मंगळवारी रात्री दरड कोसळून सहा मजुरांचा मृत्यू झाला तर , 46 बेपत्ता झाले आहेत. 
मकाउच्या डाव्हो डे ओरो प्रांतातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील मासरा गावात दरड कोसळली होती. खाणकाम करणारे सुमारे 26 मजूर दोन बसमधून घरी जात होते. थांबलेल्या बसवर तेव्हा दरड कोसळली होती. यानंतर लष्करी तुकड्या, पोलिस आणि स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. शोध आणि बचाव कार्य हाती घेतले. बुधवारी सकाळपर्यंत ते सुरू होते. सहा मृतदेह हाती लागले असून 46 जण बेपत्ता आहेत. यानंतर परिसरातील 750 कुटुंबांना सुरक्षित स्थळीं हलवले आहे.
 

Related Articles