मुंबईत नावेतून बेकायदा आलेल्या तिघांना अटक   

मुंबई : कुवेत ते मुंबई नावेतून बेकायदा प्रवास करणार्‍या तिघांना मुंंबईत अटक करण्यात आली. या प्रकरणी त्यांची कसून चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. 
'गेट वे ऑफ इंडिया' येथे ते मंगळवारी पोहोचले होते. तेथेच त्यांना नावेसह पकडून अटक केली. नावेत संशयास्पद काही आढळले नाही त्यांनी भारतीय हद्दीत बेकायदा प्रवेश केल्याचे उघड झाले. तिघेही तामिळनाडूचे रहिवासी असून कुवेतूहून मुंबईत दाखल झाले होते. कुलाबा पोलिस ठाण्यात त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, तिघेही दोन वर्षांपूर्वी कुवेतला कामासाठी गेले होते. तेथे दलालांनी त्यांना फसवले होते. त्यामुळे तेथून त्यांनी आपली सुटका करून घेतली. नंतर ते नावेतून मुंबईकडे आले होते. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

Related Articles