तमिळनाडूत निर्माणाधीन घराची भिंत कोसळून ६ जण मृत्युमुखी   

२ जखमी तर एक बेपत्ता

 
उटी : तामिळनाडूतील उटीजवळ भीषण दुर्घटना घडली आहे. उटीजवळील लव्हडेल येथे घराचे बांधकाम सुरू असताना काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली यामध्ये तब्बल सहा बांधकाम कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.
 
या अपघातात दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना उपचारांसाठी उटी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. तर एक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. एका घराच्या बांधकामात दहाहून अधिक कामगार काम करत होते, त्यावेळी भिंतीचा काही भागही कोसळला आहे. यामुळे ही दुर्घटना घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

https://twitter.com/ANI/status/1755156193989841361

Related Articles