भारतीय तरुणावर शिकागोत हल्‍ला   

न्यूयॉर्क : भारतीय वंशाच्या तरुणांचे मृत्यू आणि त्यांच्यावर हल्‍ले होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत वाढत चालले आहेत. शिकागो येथे आयटीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्‍ला झाल्यााची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. 
 
पुरूडे विद्यापीठात अभियांत्रिकीत डॉक्टरेट करणारा समीर कामत (वय 23) याचा मृतदेह नुकताच आढळला होता.त्यानंतर शिकागो येथे आयटीचे शिक्षण घेणारा सयद मजहर अली याच्यावर रविवारी प्राणघातक हल्‍ला झाला आहे. समाज माध्यमांवर त्याच्यावरील हल्ल्याची चित्रफीत झळकली होती. अनोळखी व्यक्‍तींनी त्याच्या घरात शिरून त्याला मारहाण केली होती. ठोसा लगावल्याने त्याचा चेहरा रक्‍तबंबाळ झाला होता. नाकातून रक्‍त वाहिले होते. कपड्यावर रक्‍ताचे डाग पडले होते. तो सहा महिन्यांपूर्वी हैदराबाद येथून अमेरिकेत शिक्षणासाठी गेला होता. तो रात्री घरी परतत होता. तेव्हा त्याचा तिघांनी पाठलाग केला आणि मारहाण केली होती. भारतीय तरुणांवर हल्‍ला होण्याची सहावी घटना आहे. 
 

Related Articles