युपीआय सर्व्हर डाऊन, बँकांचे युजर्स त्रस्त   

'युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजे युपीआय पेमेंट्स'चा सर्व्हर मंगळवारी सातत्याने डाऊन झालेला होता. त्यामुळे लाखो युजर्स युपीआयमधून बँकेचे व्यवहार करु शकले नाहीत. एचडीएफसी, कोटक महिंद्रा, बँक ऑफ बडोदा यांसह अनेक बँकांच्या ग्राहकांना युपीआय पेमेंट करताना अडचणी आल्या. बऱ्याच जणांनी बँक व्यवहार केले की, व्यवहार अपूर्ण असे मेसेज येत होते. त्यामुळे सोशल मीडियावर ग्राहकांनी तक्रारी नोंदवल्या.
 
सध्या भारतात साधारण ६० टक्के व्यवहार हे युपीआयद्वारे केले जातात. अशात सर्व्हर डाऊमुळे ग्राहक त्रस्त झाल्याची तक्रार नोंदवत होते. बऱ्याच ग्राहकांनी पैसे पाठवताना येणाऱ्या अडचणी सोशल मीडियावर नोंदवल्या आहेत. संपूर्ण देशभरात ग्राहकांना युपीआयद्वारे व्यवहार करताना अडचणी येत होत्या.
 

Related Articles