E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा
Samruddhi Dhayagude
07 Feb 2024
मराठा क्रांती मोर्चाची मागणी
पिंपरी : मराठा समाजाच्या हजामती करू नका म्हणत दोन समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांना दिलेल्या निवेदनात काळे यांनी ही मागणी केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, मराठा समाज आपल्या आरक्षणासाठी संविधानिक मार्गाने लढा देत आहे. इतर समाजाला न दुखावता आरक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करत आहे. असे असताना काही जण मराठा समाजाच्या विरोधात इतर समाजाच्या मनात द्वेष निर्माण करण्याचे काम करत आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यामध्ये मोठी कळीची भूमिका बजावत आहे. नुकतेच त्यांनी अहमदनगर येथे ओबीसी भटके विमुक्त एल्गार सभेत मराठा समाजाच्या विषयी चुकीची वक्तव्य करत नाभिक समाज बांधवांना आवाहन केले की, मराठा समाज बांधवांची केस आणि दाढी करू नये. त्यांच्यावर बहिष्कार टाका.
बहिष्कार टाकण्याची भाषा करत दोन समाजामध्ये दुही पसरवून सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल मंत्री भुजबळ यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच राज्य सरकारने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. भुजबळ हे समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी बांधवांसाठी काम करत असल्याचा दिखावा करत आहे.
दोन समाजामध्ये भांडणे लावून कोणती समता भुजबळ आणत आहेत, हे आधी त्यांनी स्पष्ट करावे. भुजबळ यांच्या कोणत्याही प्रलोभनांना, भाषणांना आता ओबीसी बांधवांनी बळी पडू नये असेही आवाहन काळे यांनी केले आहे.तसेच समाजासमाजामध्ये द्वेष निर्माण केल्याबद्दल त्वरित मंत्री भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काळे त्यांनी दिला.
Related
Articles
वनराईला आग लावणार्यांवर कारवाई करा
06 Jan 2025
फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई
06 Jan 2025
छत्तीसगढमध्ये चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा
06 Jan 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ’कुरूप’ नाटकाचे सादरीकरण
12 Jan 2025
प्लास्टिक उद्योजकांच्या समस्या सोडविणार : आमदार महेश लांडगे
09 Jan 2025
तमीम इक्बालकडून निवृत्तीची घोषणा
12 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)